ठाण्याचे आघाडीचे क्रिकेटपटु व क्रीडाविश्वाला लाभलेले अप्रतिम रत्नजडित कोंदण असे खंडेराव रांगणेकर यांच्या कारकिर्दीचे वर्णन करावे लागेल. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये अनेक जिगरबाज खेळी करून त्यांनी स्वत:चं पर्व गाजवून सोडले होते. १९३९ मध्ये मुंबईच्या पंचंरंगी सामन्यांच्या वेळेस, त्यांनी आपल्या अष्टपैलु व बहुआयामी खेळाचे इंद्रधनुष्य क्रिकेटविश्वाच्या आभाळामध्ये, सर्व क्रिकेट रसिकांना अत्यंत झोकात दाखविले होते. ही त्यांच्या स्वप्नवत क्रिकेट कारकिर्दीची दमदार सुरूवात होती. त्यानंतर १९४७ ते १९४८ या काळात भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया अशा तीन कसोटी सामन्यांमध्ये ते खेळले होते. उत्कृष्ठ तसंच आक्रमक फलंदाज, व पट्टीचे कौशल्यवान क्षेत्ररक्षक अशी त्यांची आशियाई देशांमध्ये ख्याती होती. “कव्हर पॉईंट”चे वेगवान व चपळ क्षेत्ररक्षण करणार्या, तसंच प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या झंझावाती व नैसर्गिक खेळाने विरूध्द गोलंदाजाला चकित करणार्या, रांगणेकरांना त्यांच्या तमाम भारतीय चाहत्यांकडून, व मुंबई आकाशवाणीचे कॉमेंटेटर होमी तल्यार खान यांजकडून क्रिकेटचा बाजीराव ही मानाची उपाधी मिळाली होती. १९६० साली ठाणे नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणूनही खंडेराव रांगणेकर अगदी सक्षमपणे वावरताना दिसले होते.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
Leave a Reply