आदिक, गोविंदराव वामनराव

Adik, Govindrao

राज्याच्या राजकारणात स्वत:च्या कर्तृत्वाने ठसा उमटवलेले आदिक हे ४५ वर्षे सक्रिय होते.

विधि शाखेचे पदवीधर असलेले आदिक यांनी १९६६ ते १९७० च्या दरम्यान येथील न्यायालयात वकिली सुरू केली. काही काळ महाविद्यालयात कायद्याचे प्राध्यापकही होते. वकिली सुरु असताना ते राजकारणात पडले. काँग्रेसचे सरचिटणीस झाले.

माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेत तयार झालेले ते नेते होते.

पुलोदच्या निर्मितीत माजी मुख्यमंत्री शरद पवारांचे ते भरभक्कम साथीदार होते. आयुष्यभर पक्षसंघटनेत विविध पदे त्यांनी भूषविली. ते राज्यसभेचे खासदारही होते.

माजी उपमुख्यमंत्री बॅरिस्टर रामराव आदिक यांचे ते धाकटे बंधू होत.

५ जून २०१५ रोजी त्यांचे निधन झाले. निधन होण्याच्या एक वर्षांपूर्वी त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली होती.

## Govindrao Adik

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*