राम नाईक हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत.
त्यांचा जन्म १६ एप्रिल १९३४ रोजी झाला. राम नाईक यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी नोकरी सोडली आणि त्यानंतर ते सक्रिय राजकारणात गेले; खासदार, केंद्रीय मंत्री झाले.
ते १९८९, १९९१, १९९६, १९९८ आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते पेट्रोलियम मंत्री होते.
जुलै २०१४ पासून राम नाईक उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल आहेत.
राम नाईक यांनी ‘चरैवेति! चरैवेति!!’ हे आत्मचरित्र लिहिले आहे.
Leave a Reply