संदीप अवचट हे भारतामधील सर्वात नामांकित व विश्वासार्ह मानले जाणारे प्रसिध्द ज्योतिषी, व प्राचीन ज्योतिर्विद्या तसेच अर्वाचीन अंकशास्त्राचे गाढे आभ्यासक व चिकीत्सक आहेत. ज्योतीषास्त्राला आधुनिक विज्ञानाचा परिस्पर्श देणार्या अवचटांनी केवळ या शास्त्रात आधीपासून असलेल्या परंपरागत पध्दतींवर व निकषांवर आंधळा विश्वास ठेवला नाही तर आपणहुन या क्षेत्रात संशोधन करून स्वःताचे सिध्दांत निर्माण केले, त्यामुळे ज्योतिषशास्त्राला वैज्ञानिक आधुनिक विज्ञानवादी मतप्रवाहांची व विचारसरणींची कास धरायला लावणारे शास्त्रज्ञ, अश्या प्रतिमेमुळे त्यांच्या नावाभोवती जनतेमध्ये, वेगळेपणाचे असे आदरयुक्त वलय निर्माण झाले आहे. ज्योतिर्विद्येप्रमाणेच काव्य, लेखन, मिडीया व इतर कला क्षेत्रांमध्येही त्यांचा सहज वावर असल्यामुळे ते कलाक्षेत्रातील रथी महारथींनाही, त्यांच्या उत्तम विनोदबुध्दीमुळे व प्रतिभावंत तसेच ओघवत्या लेखनशैलीमुळे चांगले परिचीत आहेत.
ज्योतिशशास्त्रामध्ये मुरलेल्या संदीप अवचटांनी, कित्येक बुडत्या जोडप्यांना त्यांच्या जटील समस्यांचे निराकारण करून त्यांना चांगल्या व यशाच्या मार्गाला लाविले आहे. समस्यांचे अचुक निदान, शास्त्रोक्त पध्दतींनी ओतप्रोत भरलेले उपाय-योजना व सल्ले, तसेच विज्ञानाने हिरवा झेंडा फडकविलेल्या पध्दती वापरून केलेले काळजीपुर्वक निराकरण या गोष्टींमुळे भारतातील कित्येक लोकांची त्यांच्या कार्यपध्दतीवर अमाप श्रध्दा बसलेली आहे. सुप्तांक शोधन पध्द्तीचे ते जनक आहेत. त्यांची ही पध्दत आजही अंकगणितशास्त्रामधला एक मैलाचा दगड मानला जातो. 1999 मध्ये अवचटांना ज्योतिष बृहस्पती पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
याशिवाय ते उत्तुंग प्रतिभेने मढलेले व असामान्य कल्पनाशक्तीने नटलेले हळवे कवीदेखील आहेत. शांता शेळके, एन. डी. मनिहर, रामदास फुटाणे अशा दिग्गज कवींसोबत आपली विपुल काव्यसंपदा लोकांसमोर उलगडायची संधी त्यांना अनेक कार्यक्रमांमुळे व स्नेहसंमेलनांमुळे मिळाली आहे. संदीप अवचटांनी अगदी लहानपणी ज्योतिर्विद्येसारखी अवघड, गुंतागुंतीची, व बौध्दिक क्षमतांचा कस बघणारी कला निपुणपणे आत्मसात केल्यामुळे भारतातील सर्वात लहान ज्योतिषी बनण्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा आहे. अचुकतेच्या बाबतितही त्यांचा हात धरू शकणारा ज्योतिषीही विरळाच मानला जातो व त्यांनी मांडलेले आराखडे, केलेली गणिते, सांगितलेले सिध्दांत, एखाद्याच्या भविष्याचे केलेले निदान व सरतेशेवटी ते बदलविण्यासाठी सांगितलेले उपाय हे वीस वर्षांपेक्षा जास्ती वर्षे अचुक, जसेच्या तसे व लाभदायी ठरतात, असे इतिहास सांगतो. त्यामुळे त्यांची या प्रांतामधील प्रतिष्ठाही खुप मोठी आहे.
श्री शाहु मोडक पुरस्कार, श्री शंकराचार्य पुरस्कार व सर्वोत्कृष्ठ ज्योतिषी हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार असे अनेक खिताब त्यांच्या नावावर जमा आहेत .हा राष्ट्रीय पुरस्कार तर त्यांना वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी प्राप्त झाला होता. टेलिव्हीजन विश्वावर देखील संदिपांनी अनेक कार्यक्रम व मुलाखतींमध्ये सक्रिय भाग घेवून त्यांच्या वैज्ञानिक कलेचा सार्थ प्रसार व प्रचार केला आहे. स्टार माझा व स्टार प्रवाह वरील त्यांचे कार्यक्रम तर इतके तुफान लोकप्रिय आहेत की टी. आर. पी. च्या व्यावसायिक गणीतांबाबतीत ते प्रथम क्रमांकावर आहेत. यासाठी त्यांच्यामधील तज्ञ व अष्टपैलु ज्योतिषीच नाही तर लोकांशी संवाद साधताना त्यांनी दाखविलेली दिलखुलासपणा, हजरजबाबीपणा, व सेवातत्परता या गोष्टीसुध्दा तितक्याच जबाबदार आहेत. लोकांचे कौटुंबिक व वैयक्तिक प्रश्न सोडवता सोडवताच त्यांना कार्यक्रम रटाळ व कंटाळवाणा नये यासाठी अनेक कल्पक युक्या ते योजतात, ज्योतिषशास्त्रामागचं विज्ञान व रहस्यमयी गुपितं रोचक व रंजक उदाहरणे देवून त्यांना मनोरंजक पध्दतींनी उलगडुन दाखवितात.
Leave a Reply