मालिका व नाटक अशा सर्वच क्षेत्रात आपला अभिनय लोकांपर्यंत पोहचवणारे अभिजित चव्हाण हे गेली २५ वर्षं अभिनय क्षेत्रात काम करत आहेत.
चारचौघी, मी नथुराम गोडसे बोलतोय, गोजिरी, अधांतर, भिती एक सत्य, ह्या आणि अशा विविध चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाची कमाल दाखविली आहे. कॉलेज स्पर्धांपासून सुरवात करुन आता चित्रपट, नाटक आणि मालिकांकडे यशस्वी वाटचाल करणारे अभिजीत चव्हाण यांना नवीन कलाकार घडवायचे आहेत. त्यासाठी त्यांची “चिरंतन कलामंच” ही संस्था कार्यरत आहे.
पुरस्कार : त्यांना २०१२ साली पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानीतही करण्यात आले आहे. आय.एन.टी. मध्ये ३ वर्षे सर्वोत्तम सहाय्य अभिनेता म्हणून त्यांना गौरवण्यात आलं.
<!–
– अभिनेता
गाव : वैभववाडी
पत्ता : सी ३०८, कविता कुंज, नातू परांजपे कॉलनी, ठाणे (पू.)
कार्यक्षेत्र : अभिनय
भ्रमध्वनी : ९३२२५०९३२२
ई-मेल : abhijitbchavan@gmail.com
–>
Leave a Reply