कला आणि संगीताचे वरदान असलेल्या ठाणे शहरात आजवरच्या कारकीर्दीत अनेक मात्तबर प्रतिथयश गायक, संगीतकार नावारुपाला आले. त्यातील एक म्हणजे शास्त्रीय गायक अच्युत केशव अभ्यंकर.
अच्युत केशव अभ्यंकर यांनी किराणा घराण्याचे अध्वर्य कै.पं. फिरोझ दस्तूर यांकडून शास्त्रीय संगीताच्या प्रेमाखातर, त्याची जोपासना व प्रचाराचा विडा उचललेल्या अभ्यंकरांनी आकाशवाणी येथे उच्च श्रेणीचे कलाकार म्हणून अनेक गाण्याचे कार्यक्रम केले. तसेच देश – विदेशांत असंख्य मैफिली सादर करुन नावलौकीक प्राप्त केला. आपले गुरु कै. पं. फिरोझ दस्तुर यांचा अनमोल ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याच्या कार्यात स्वत:ला झोकून देऊन श्री. अभ्यंकर यांनी ठाण्यातील अनेक संगीत संस्थात संगीत विद्यादानाचे अमूल्य काम केले आहे. जे अजूनही अविरत चालू आहे. गेली ६२ वर्षे ते विद्यादान करत असून त्यातील काही विद्यार्थ्यांनी संगीतातील उच्च पदव्या प्राप्त करुन ठाण्यातील कंठ्यसंगीताचा वारसा पुढे चालू ठेवला आहे.
किराणा घराण्याचे गायक अच्युत अभ्यंकर यांच्यावरील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
## Achyut Keshav Abhyankar
Leave a Reply