आदित्य ठाकरे हे विद्यमान आमदार आहेत. २०१९ साली ते निवडणुकीला वरळी प्रभागातून निवडून आले. आदित्य ठाकरे सध्या कॅबिनेट मंत्रिपद देखील भूषवित आहेत. त्यांच्याकडे सध्या पर्यावरण आणि वातावरण व पर्यटन ही खाती आहेत. आदित्य ठाकरे हे २०१० साली शिवसेना युवा सेनेचे अध्यक्ष झाले.
आदित्य ठाकरे यांचे जन्मस्थान मुंबई असून जन्मतारीख १३ जून १९९० आहे. त्यांचे शालेय शिक्षण Bombay Scottish School , माहीम येथून पूर्ण झाले. त्यांनी सेंट झेव्हिएर्स महाविद्यालयातून इतिहास विषयात बी.ए. पदवी प्राप्त केली व के.सी. लॉ महाविद्यालयातून एल.एल.बी. ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
आदित्य ठाकरे हे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांचे पुत्र असून दिवंगत शिवसेना पक्षप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. त्यांच्या आईचे नाव रश्मी ठाकरे आहे व लहान भावाचे नाव तेजस आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
#Aditya Thackeray
Leave a Reply