ऐश्वर्या नारकर ही मराठी रंगभूमी , चित्रपटसृष्टी , जाहिरात क्षेत्रात तसेच मराठी व हिंदी मालिकासृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे. त्यांचा जन्म १० मे १९७० रोजी झाला. त्यांनी शालेय शिक्षण डोंबिवली दत्तनगर मधील स्वामी विवेकानंद विद्यालय येथून पूर्ण केलं. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी विज्ञान शाखेतून पूर्ण केलं.
त्यांनी त्यांच्या बालपणात एका बालनाट्यापासून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्या बालनाट्यात त्यांनी ‘ ज्ञानेश्वर महाराजांची ‘ भूमिका साकारली होती.
व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचं पहिलं नाटक ‘ गंध निशिगंधाचा ‘ हे होतं. पुढे त्यांनी अनेक नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचं गारुड , रसिक प्रेक्षकांच्या मनावर केलं. त्यातील सध्या चर्चेत असलेलं सोयरे सकळ ह्या नाटकात त्यांनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. ह्यात त्यांनी केलेल्या दोन्ही भूमिका विशेष कौतुकास पात्र ठरल्या , त्याचे कारणही तसेच आहे कारण ह्या नाटकात साकारलेली दोन पात्र वेगवेगळ्या वयाची आहेत. त्यातील एक पात्र तरुण वयाचं तर दुसरं उतार वयाचं आहे.
चित्रपटातही त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. त्यातील नुकत्याच प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट धडक असो किंवा बाबांची शाळा , yellow , अंकगणित सारखे वैचारिक चित्रपट असोत हे प्रेक्षकांच्या दृष्टीने विशेष लक्षवेधी ठरले.
मालिकांमध्ये महाश्वेता, लेक माझी लाडकी, या सुखांनो या, स्वामिनी सारख्या अनेक मालिकांमधून त्या प्रेक्षकांना नेहमीच दिसत राहिल्या. त्यांनी हिंदी मधील घर की लक्ष्मी बेटीया मालिकेतही काम केलं आहे.
जाहिरात क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला. केसरी टूर्सची जाहिरात ही त्यातली एक भावपूर्ण जाहिरात ठरली.
Leave a Reply