
सध्या आघाडीच्या संगीतकार जोड्यांमध्ये अजय-अतुल हे नाव आवर्जून घेतलं जातं. केवळ मराठीतच नाही तर हिंदी आणि तेलुगू भाषांमधील चित्रपटांसाठीही या जोडीने संगीत दिग्दर्शन केलंय. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या जोडीचे संगीत अनेकांनाच मंत्रमुग्ध करतं.
या जोडीने आपल्या करीयरची सुरुवात विश्वविनायक या प्रसिद्ध अल्बमने केली. विश्वविनायक या अल्बममध्ये पारंपरिक आरती, स्तोत्रं त्यांनी वेगळ्या रूपात जगापुढे ठेवली. या वेगळेपणामुळे हा अल्बम जगभर लोकप्रिय झाला. संगीतकार असण्याबरोबरच चांगले गायक म्हणूनही त्यांची ओळख आहे.
त्यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘सावरखेड एक गाव’ या चित्रपटातलं ‘वार्यावरती गंध पसरला’ हे गाणं असो किंवा ‘अगंबाई अरेच्चा’मधलं अतिशय मधुर चालीचं ‘मन उधाण वार्याचे’ हे गाणं असो किंवा ‘जत्रा’मधली ‘कोंबडी’, तसंच ‘दे धक्का’, ‘साडे माडे तीन’, ‘उलाढाल’, ‘नटरंग’ ‘जोगवा’, ‘बेधुंद’, ‘एक डाव धोबी पछाड’, ‘सही रे सही’ किंवा ‘लोच्या झाला रे’ सारखी मराठी नाटकांची, मालिकांची शीर्षकगीते, अनेक हिंदी चित्रपट, ‘झी मराठी’चे गौरवगीत… अगदी मराठी-हिंदीच्या पलीकडेही जाऊन तेलुगू चित्रपट गीतांनाही त्यांनी संगीत दिलं आहे.
सैराट मधील ‘याड लागले‘, “झिंगाट‘, “सैराट झालं जी‘, “आत्ताच बया‘ या चारही गाण्यांनी सर्वांनाच “याड‘ लावलं.
अनेकानेक पुरस्कारांनी त्यांना आजवर गौरवले गेले आहे.जोगवा या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
अजय गोगावलेचा (Ajay Gogavale) जन्म ११ सप्टेंबर १९७४ रोजी झाला.
Leave a Reply