अजित पवार

राजकीय नेते

अजित पवार हे एक प्रसिद्ध राजकीय नेते आहेत. ते सध्या महाराष्ट्राचे विद्यमान उप मुख्यमंत्री व अर्थमंत्री असून , ते बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. त्यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी देवळाली प्रवरा , राजुरी जिल्हा येथे झाला. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण तिथेच पूर्ण केले. अजित पवार हे राजकारणातील मुरब्बी व्यक्तिमत्त्व माननीय श्री. शरद पवार ह्यांचे पुतणे आहेत.

अजित पवार  देवळाली प्रवरा येथे प्राथमिक शिक्षण घेत असताना त्यांचे काका शरद पवार हे सत्ताधारी काँग्रेसमधील नावाजलेले राजकीय नेते बनले होते. त्यामुळे अजितजी पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेले. १९८२ मध्ये जेव्हा सहकारी साखर कारखान्याच्या बोर्डावर निवड झाली तेव्हा अजित पवारांनी राजकारणात प्रवेश केला. १९९१ मध्ये ते पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि ते १६ वर्षे या पदावर राहिले. या काळात ते बारामतीतून लोकसभेचे खासदार म्हणूनही निवडले गेले. नंतर त्यांनी लोकसभेची जागा आपल्या काका शरद पवार यांच्यासाठी रिकामी केली. पुढे ते पीव्ही नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये संरक्षणमंत्री झाले होते. त्यानंतर ते बारामती येथून महाराष्ट्र विधानसभेचे (आमदार) सदस्य म्हणून निवडले गेले. १९९५, १९९९, २००४, २००९, आणि २०१४ मध्ये पवार याच मतदारसंघातून पुन्हा निवडून आले.

अजित पवारांनी राजकारणात बरीच पदं भूषवली आहेत. अजित पवार हे संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत.

#Ajit Pawar

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*