रेकॉर्ड्स कलेक्टर अजित प्रधान यांचा जन्म ४ सप्टेंबर १९४९ रोजी झाला.
प्रधानांकडे प्रामुख्याने १९८०पर्यंतच्या हिंदी चित्रपट संगीताचा संग्रह आहे. शंकर-जयकिशन आणि ओ. पी. नय्यर या दोन संगीतकारांचं जवळजवळ सगळं कलेक्शन त्यांच्याकडे आहे. त्याशिवाय सी. रामचंद्र, एस. डी. बर्मन आणि त्या काळातल्या बहुतेक सगळ्या संगीतकारांच्या रेकॉर्ड्स त्यांच्या खजिन्यात आहेत.
अमिताभ बच्चन यांच्या आवाजातल्या हरिवंशराय बच्चन यांच्या कविता, मीनाकुमारी यांनी स्वत: वाचलेल्या स्वत:च्या कविता, ‘मेरा नाम जोकर’ची डबल रेकॉर्ड, ‘मेरा नाम जोकर’ची फक्त पाश्र्वसंगीत असणारी स्वतंत्र रेकॉर्ड, ‘अयोध्येचा राजा’ या पहिल्या मराठी बोलपटाची रेकॉर्ड, भारत आणि अमेरिका यांची राष्ट्रगीतं अशा कित्येक दुर्मीळ रेकॉर्ड्स त्यांच्याकडे आहेत.
अजित प्रधान यांच्याविषयी विस्तृत माहिती देणारा संजीव वेलणकरांचा लेख
https://www.marathisrushti.com/articles/records-collector-ajit-pradhan/
# Pradhan Ajit
Leave a Reply