अक्षय दांडेकरचा जन्म १४ नोव्हेंबरला झाला असून, तो मराठी विषयात पदव्युत्तर आहे.
लहानपणापासून कवितांची आवड असलेल्या अक्षय यांनी मराठीत ”रॅप” या गीत प्रकाराची निर्मिती केली आहे. याव्यतिरिक्त अनेक एकांकिका तसेच दूरचित्रवाणी मालिकांमधून अक्षय यानी आपल्या अभिनयाची झलकही दाखवली आहे. हिंदीत ”इस प्यार को मै क्या नाम दूं” तर मराठीत ”मायेची सावली”या मालिकांमध्ये अक्षयनी काम केलंय. त्याशिवाय ”जवानी जिंदाबाद”, ”हॅम्लेट”, ”बेबंदशाही”, ”पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी” अशा दर्जेदार प्रायोगिक नाटकांमधून अक्षय दांडेकर यानी रंगभूमीवरही काम केलं आहे.
सध्या गाजत असलेल्या ”जय मल्हार” या पौराणिक मालिकेत अक्षय ‘नंदी’ची भूमिका साकारत असून रुंजी, लक्ष्य या मालिकेतून देखील त्यांनी विविधांगी व्यक्तीरेखा केल्या आहेत.
याशिवाय ”एफ एम ज्ञानवाणी मुंबई” या कम्युनिटी रेडिओवर ”रेडिओ जॉकी” म्हणूनही तो कार्यरत आहे.
Leave a Reply