अमेय वाघ

नाट्य, चित्र अभिनेता 

अमेय वाघ एक अभिनेता म्हणून सध्या चर्चेत असलेलं नाव आहे . अमेयने कुणाच्याही अभिनय शैलीची नक्कल न करता स्वतःची एक वेगळी अभिनय शैली विकसित केली. त्या कसदार आणि सहज अभिनय करण्याच्या शैलीमुळे तो हल्ली बऱ्याच चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला नेहमी येत असतो.

अमेय वाघचा जन्म १३ नोव्हेंबर १९८७ रोजी पुण्यात झाला. अमेयने आपलं महाविद्यालयीन शिक्षण बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स , पुणे येथून पूर्ण केले. अमेयने महाविद्यालयात शिक्षण घेत असताना एकांकिकांमधून , स्पर्धात्मक नाटकांमधून अभिनय करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत अमेयने अमर स्टुडिओ , कट्यार काळजात घुसली ( डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान ) , दळण सोबत अनेक नाटकं केलेली आहेत.

पुढे तो झी मराठी वाहिनीवरील ‘ दिल दोस्ती दुनियादारी ‘ ह्या मैत्रीवर आधारित असलेल्या मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर आला. ह्यात त्याने कैवल्य कारखानीस नामक भूमिका साकारली. ह्या मध्ये तो एक गायक आणि music composer बनण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी घराबाहेर पडलेला दाखवला आहे. पुन्हा ह्याचा सिक्वल दिल दोस्ती दोबारा मध्ये तो साहिल नावाच्या पात्राच्या भूमिकेत दिसला.

अमेय वेब सिरीज जगतात ही खूप प्रसिद्ध आहे. त्याने आतापर्यंत sacred games 2 (कुशल नामक पात्र), कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुण, बॉयगिरी (बाजीराव घाडीगावकर नामक पात्र), बहुचर्चित असलेली असुर (रसूल शेख नामक पात्र) इत्यादी वेब सिरीज मध्ये अभिनय केला आहे.

अमेयचा मराठी चित्रपटसृष्टीच्या कारकिर्दीतील पहिला चित्रपट पोपट हा होता. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे होते. ह्यात अमेयने रघु नामक पात्र साकारलं होतं. हा चित्रपट २०१३ साली चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. पुढे त्याने शटर, घंटा, मुरांबा, फास्टर फेणे, गर्लफ्रेंड, धुरळा असे चित्रपट केले. सध्या सुरू असलेल्या lockdown मुळे त्याने अभिनय केलेला आणखीन एक चित्रपट प्रदर्शित व्हायचा राहिला आहे. त्या चित्रपटाचे नाव ‘ मी वसंतराव ‘ असे आहे. हा चित्रपट १ मे २०२० रोजी प्रदर्शित होणार होता.

अमेयने हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची जादू दाखवली. त्याने बिल्लू बार्बर , अय्या आणि हायजॅक सारख्या मोठ्या चित्रपटात अभिनय केला आहे.

## Amey Wagh

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*