
जन्मः १९ नोव्हेंबर १९८५, सोलापूर, महाराष्ट्र
अनघा अरुण देशपांडे ही भारतीय महिला क्रिकेट संघाची एक सदस्य आहे.
यष्टीरक्षक आणि उजव्या हाताची फलंदाज अशी तिची संघातील भूमिका आहे. ९ मे २००८ रोजी पाकिस्तान महिला संघाविरूद्ध एकदिवसीय पदार्पण केलेल्या अनघाने ६ मार्च २०१० पर्यंत १२ एकदिवसीय आणि ७ टी२० सामन्यांमध्ये भाग घेतलेला आहे.
Leave a Reply