ग्रामीण उपयोजीत तंत्रज्ञानाचे एक गाढे अभ्यासक आणि दोनदा अॅश्डेन पुरस्कारप्राप्त (२००२ आणि २००६) भारतीय शास्त्रज्ञ.
शिक्षण पुणे आणि जर्मनी येथे झाले. अनेक उपयोजित तंत्रज्ञानातील संशोधनाचे मानकरी आणि शेतीसाठी उपयुक्त उपकरणांचे शोधक. संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न आणि कृषिविषयक संस्थावर तज्ज्ञ म्हणून कार्य केले.
निर्धुर चुलीवरचे त्यांचे संशोधन लोकप्रिय झाले. त्यांनी नवीन प्रकारचे बायोगॅस संयंत्र निर्माण केले. अनेक पारितोषिकांचे मानकरी तसेच अॅप्रोप्रिएट रुरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष. मराठी विज्ञान परिषदेच्या २००३ सालच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष.
(जन्म १९३६)
माहितीस्त्रोत – (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष
Leave a Reply