आनंद इंगळे हा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. आतापर्यंत त्याने बऱ्याच मराठी चित्रपटात आणि नाटकांत काम केले आहे. तो मराठी सिनेसृष्टीपुरता मर्यादित न रहाता हिंदी सिनेमासृष्टीत मुशाफिरी करू लागला आहे. त्याचा “Daddy” हा हिंदी सिनेमा बहुचर्चित ठरला.
आनंद इंगळेचा जन्म पुण्यात ११ नोव्हेंबर १९७२ साली झाला. त्याचे शालेय शिक्षण पुण्याच्या मॉडर्न हायस्कुल मध्ये पूर्ण झालेले असून महाविद्यालयीन शिक्षण पुणे युनिव्हर्सिटी मधून पूर्ण झाले आहे.
आनंद इंगळेने त्याच्या चित्रपटातील अभिनयाची कारकीर्द २०१० साली ” एका लग्नाची गजब गोष्ट “ पासून सुरु केली. त्याचं ” Daddy ” (२०१७) हे हिंदीतील पहिलं प्रोजेक्ट ठरलं आणि ” प्रपंच ” (१९९९-२००२) ही त्याने अभिनय केलेली पहिली मालिका ठरली. ह्या मालिकेत त्याने ” मंग्या “ नावाचं पात्र साकारलं होतं. आनंद इंगळेने आतापर्यंत A Fair Deal , माकडाच्या हाती शँपेन , लग्नबंबाळ , व्यक्ती आणि वल्ली , वाऱ्यावरची वरात अशा अनेक प्रसिद्ध नाटकांत कामं केलेली आहेत. अशा ह्या बहुरंगी कलाकाराला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून Maharashtra State Film Award मिळाला. हा किताब त्याला ” पाऊलवाट ” ह्या मराठी नाटकात केलेल्या विनोदी भूमिकेसाठी मिळाला होता.
#Anand Ingale
Leave a Reply