अनंत गंगाराम गीते हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते शिवसेना पक्षाचे सदस्य आहेत. अनंत गीते हे २०१४ – २०१९ ह्या काळात नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक क्षेत्रांतील उद्योगांचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री होते , तसेच ऑगस्ट २००२ – मे २००४ पर्यंत ते केंद्रीय ऊर्जा विभागाचे कॅबिनेट मंत्री होते.
अनंत गीते यांचा जन्म २ जून १९५१ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील तिसंगी ह्या गावात झाला.
अनंत गीते हे सहा वेळा लोकसभेवर निवडून आले होते. २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी तत्कालीन खासदार आणि माजी कॅबिनेट मंत्री ए. आर. अंतुले यांचा पराभव करून रायगडमधून १,५०,०० मतांच्या फरकाने विजय मिळवला. २०१४ मध्ये त्यांनी रायगडमधून त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी सुनील तटकरे यांना २११० मतांनी पराभूत करून विजय मिळवला. यापूर्वी त्यांनी ११ व्या लोकसभेपासून १४ व्या लोकसभेपर्यंत चार वेळा रत्नागिरी मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
अनंत गीते यांनी १९८५ – १९९२ पर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक पदाचा पदभार सांभाळला. १९९० – १९९२ या काळात ते मुंबई महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष होते. १९९६ – १९९८ सालात ते ग्रामीण व नगर समितीचे सदस्य होते. १९९८ – १९९९ मध्ये त्यांनी परराष्ट्र समिती आणि तिच्या तिसऱ्या उपसमितीचे सदस्य पद, तसेच मानवी पुनरुत्थान विकास मंत्रालय, सल्लागार समितीच्या सदस्य पदाचा भार सांभाळला.
अखेरीस २०१८ सालात शिवसेना नेते म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
#Anant Geete
Leave a Reply