कान्हेरे, अनंत

Kanhere, Anant

 

अनंत कान्हेरे हे मूळचे औरंगाबादचे. त्यांचे शालेय शिक्षण हे बरेचसे औरंगाबाद येथेच झाले, परंतु नंतर ते शिक्षणासाठी नाशिक येथे झाले.
त्यांची शरीरयष्टी काही धिप्पाड नव्हती, तर तशी किरकोळच होती, पण लहानपणापासूनच मनाने ते अतिशय खंबीर व निश्चयी होते.नाशिक येथे शिक्षण चालू असतानाच. त्यांनी पिस्तुल चालविण्याचे व नेमबाजीचे शिक्षण घेतले. त्या काळात नाशिक येथे जिल्हा कलेक्टर म्हणून जॅक्सन, नावाचा एक अत्यंत क्रुरकर्मा असा इंग्रज अधिकारी होता. तेथील क्रांतिकारकांनी त्याला मारण्याचे ठरविले व ती जबाबदारी अनंत कान्हेरे यांनी स्वीकारली. ते योग्य संधीची वाट पाहात त्याच्या मागावरच होते. नाशिक येथील एका नाटकगृहामध्ये किर्लोंस्कर मंडळीच्या शारदा या नाटकाचा प्रयोग होता. त्याला कलेक्टर जॅक्सन यांना आमंत्रण होते व जॅक्सन यांनी ते स्वीकारले होते. ही बातमी सर्वत्र पसरली होती. लोकांमध्ये खूप उत्सुकता होती. अनंत कान्हेरे यांनी ही संधी साधण्याचे ठरवले.
ठरल्याप्रमाणे जॅक्सन आले व त्यांच्या खास ठरविलेल्या राखीव खुर्चीवर बसले. अनंत कान्हेरे तेथे जवळच होते. क्षणार्धामध्ये त्यांनी आपले पिस्तूल काढले व जॅक्सन यांच्यावर सात आठ गोळयांच्या वर्षाव केला जॅक्सन जागेवरच ठार झाले. तो दिवस होता. 21 डिसेंबर 1909.
जॅक्सन यांना ठार मारल्यावर अनंत कान्हेरे यांनी स्वतलाच मारुन घेण्याचे ठरवेल होते. पण त्यापूर्वीच ते आजूबाजूच्या जॅक्सन यांच्या सहकार्‍यांकडून पकडले गेले, त्यामूळे त्यांचा तो हेतू साध्य झाला नाही.पोलिसांनी त्यांना पकडले तेव्हा, माझे कर्तव्य मी केले आहे. मी निसटून जाऊ इच्छित नाही असे उदगार त्यांनी काढले . अंनत कान्हेरे यांच्यावर खटला चालून त्यांना 19 एप्रिल 1910 रोजी फाशी देण्यात आले. त्या वेळी भारत माता कि जय व क्रांती चिरायू होवो, असे उदगार काढून ते आनंदाने फाशी गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*