
तमाशाप्रधान चित्रपटांचा सुवर्णकाळ म्हणजे पन्नास,साठ आणि सत्तरचे दशक असून या कालावधी मध्ये दिग्दर्शक अनंत माने व संगीतकार वसंत पवार अनेक सुंदर सुंदर चित्रपट रसिकांसमोर सादर केले. अवघ्या ६० हजारांत चित्रपट निर्माण करून अनंत मानेंनी मराठी चित्रपट जगवला. याचे श्रेय त्यांच्या ‘सांगते ऐका’ या तमाशापटाला द्यावे लागेल. तमाशापट हा मराठी चित्रपटांचा नवा चेहरा होता. तो मानेंनी मराठी चित्रपटांना दिला.
’पिंजरा’, ’लक्ष्मी’, ’सुशीला’, ’आई’ हे अनंत माने यांचे गाजलेले चित्रपट आहेत.
वयाच्या ऎंशी वर्षापर्यंत तब्बल साठ चित्रपट दिग्दर्शन करणारे अनंत माने हे एकमेव दिग्दर्शक आहेत. दिग्दर्शक अनंत माने यांनीच निर्मित केलेल्या “सांगत्ये ऐका, या चित्रपटाने भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीतही इतिहास घडवला होता, नवीन विक्रम प्रस्थापित केले होते. त्या चित्रपटाला ‘चित्रपटसृष्टीच्या इतिहासातलं मानाचं पान’ असे मानतात. तमाशापट काढणारे अनंत माने असा शिक्का त्यांना बसला. त्यांनी उत्कृष्ट तमाशापट तर दिलेच पण मराठमोळा तमाशा रजतपटावर आणून त्यांनी या अस्सल मराठी मनोरंजनाला एक दर्जा प्राप्त करुन दिला.
आज राजकीय पार्श्वभूमीवर अनेक मराठी, हिंदी चित्रपट आपण पाहतो. या चित्रपटांची सुरुवातही त्यांनीच ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटात प्रथम केली.
अनंत माने यांच्यावरील संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
## Mane, Anant
Leave a Reply