अनेक दर्जेदार नाटकं, मालिका व चित्रपटातून आपल्या लक्षवेधी अभिनयाची छाप पाडणारा होतकरू अभिनेता अंगद काशिनाथ म्हसकर हा देखील ठाण्याला लाभलेल्या रत्नांपैकी एक आहे.
“ती फुलराणी”, “रणांगण”, “ऑल दि बेस्ट”, “बुढ्ढा होगा तेरा बाप”, “इत्यादी नाटकं; “वादळवाट”, “कुलवधू”, “सप्तपदी”, “श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी”, “गुंतता हृदय हे”, इत्यादी मालिका व “बालगंधर्व” या संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ रंगकर्मींवर बेतलेल्या चित्रपटात श्री. म्हसकर यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप रसिक मनावर पाडली आहे. सन २००० पासून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. पुढील काळात अनेक मालिका केल्या. “श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी” या मालिकेतील “बाजीराव पेशवेच्या” पात्राने त्यांच्या अभिनयातील कारकिर्दीला विशेष वळण दिले.
पुरस्कार : त्यांना २०१० साली पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानीतही करण्यात आले आहे. आय.एन.टी. मध्ये ३ वर्षे सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता म्हणून त्यांना गौरवण्यात आलं.
Leave a Reply