अनिकेत केळकर हा मराठी चित्रपट , नाट्य आणि मालिका सृष्टीत कार्यरत असलेला एक अभिनेता. त्याने हिंदी सृष्टीतही काही प्रोजेक्ट्स केलेली आहेत.
अनिकेतची अभिनय शैली फार वेगळी आहे आणि हे त्याने प्रत्येक प्रोजेक्टमध्ये सिद्धही केले आहे. आतापर्यंत अनिकेतने लक्ष (स्टार प्रवाह वर दाखवली जाणारी मराठी मालिका) , ललित २०५ (स्टार प्रवाह मराठी वाहिनीवर दाखवली जाणारी मालिका) मध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
अनिकेतनी मराठी चित्रपट सृष्टीतही अनेक भूमिका साकारून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. असं पहायला गेलो तर त्याने बरेच मराठी चित्रपट केले आहेत. त्यापैकी 1234 , मोर्चा , लॉर्ड ऑफ शनि शिंगणापूर , साहेब , दंडित , सौ. शशी देवधर , गोष्ट लग्नानंतरची , फ्रेंडशिप बँड , इभ्रत आणि अजिंक्य (२०२०) ही प्रोजेक्ट्स गाजली.
Leave a Reply