अनिल यदाओराव निमगाडे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात 24 जानेवारी, 1972 रोजी झाला. अतिशय धार्मिक वृत्तीचे व आहाराने शुध्द शाकाहारी असलेले निमगाडे एक प्रतिष्ठीत क्रीडा अधिकारी आहेत. स्वतःच्या व इतरांच्या निकोप प्रकृतीबद्दल ते कमालीचे दक्ष असतात, व तंदुरूस्ती कशी राखावी, वजन कसे घटवावे, व्यायामाची व मैदानी खेळांची गोडी निर्माण कशी करावी व दीर्घकाळापर्यंत टिकवावी कशी, आहार कसा असावा, कॅलरी मॅनेजमेंट, तसेच निरोगी राहण्याकरिता जीवनपध्दतींमध्ये अनुकुल बदल कसे करावेत या आपल्याला दररोज छळणार्या प्रश्नांवर तर ते एक चालता बोलता ज्ञानकोशच आहेत. विविध खेळ कसे खेळावेत, किंवा विशिष्ठ एका खेळामध्ये पारंगत्व मिळविण्याकरिता कोणती कौशल्ये अंगी बाणवावी लागतात यांबाबतीतले त्यांचे विचारही अगाध आहेत. त्यांच्या परिसरात राहणार्या मुलांमध्ये निरनिराळ्या पारंपारिक, व शारिरीक क्षमतांचा कस पाहणार्या खेळांबद्दल अभिरूची निर्माण करण्यात सिंहाचा वाटा आहे.
Leave a Reply