अॅड. अनिता सुनिल गौरी ह्या ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ५२ च्या नगरसेविका आहेत. लहानपणापासून सामाजिक, कौटुंबिक, व राजकीयदृष्टया प्रगत अशा वातातवरणात त्यांचा सांभाळ झाल्यामूळे त्यांना आपल्या व्यक्तित्वाच्या प्रत्येक पाकळीचा पुर्ण विकास करण्याची पुरेपूर संधी मिळाली. त्यांचे वडिल आर. सी. पाटील हे सुधारणावादी राजकारणामध्ये चांगले मुरलेले व्यक्तिमत्व असल्यामुळे, त्यांनी आपल्या मुलीला
उच्च शिक्षणाच्या सर्व सोयी पुरवल्या. बी. ए., एल. एल. बी., भारतामध्ये केल्यानंतर त्यांनी प्रोग्रामिंग पदवीका आभ्यासक्रम इंग्लंडमधून पुर्ण केला. त्यांच्या या उत्तम शैक्षणिक आलेखामूळे कोकण एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून तेथे चार हजार शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रातील कार्य व दांडगा अनुभव असलेल्या अनिता गौरी यांची दखल शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे ह्यांनी घेवून त्यांची मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर निवड केली. सध्या प्रभागातील महिलांचे सर्व प्रकारचे प्रश्न सोडविण्याचे व महिलांचे बचत गट स्थापन करून आर्थिक व मानसिकदृष्टया कणखर बनविण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले आहे. ६८ शेतकर्यांचे प्रश्न त्यांनी सोडवून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. आपल्या वकिल या पदवीचा व्यवसाय म्हणून उपयोग न करता त्या समाजसेवा म्हणून जनतेच्या तक्रारी मोफत सोडवत असतात. निवडून आल्यानंतर गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेली कामे त्यांनी मार्गी लावून ठाणे शहराचा कायापालट केला आहे.
आतापर्यंतचे कार्यः-
१) प्रभाग क्रमांक ५२ मध्ये खारीगांव स्मशानभूमीकडे जाणार्या रस्त्यावर पेव्हर ब्लॉकची रचना केली.
२) मच्छी मार्केट, सायली अपार्टमेंट परिस, हिरादेवी अपार्टमेंट परिसर सार्वजनिक शौचालय परिसर येथेही पेव्हर ब्लॉक बसविले व पायवाटा दुरूस्त केल्या.
३) भोईर चाळ परिसरात गटार बांधणे, खारीगांव येथील गणेशनगर परणिता इमारत ते उर्जाप्रतीक कॉर्नर येथे गटार बांधली, केसरकर हाऊस ते गणदीप अपार्टमेंटपर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे व गटारे दुरूस्त केली. ऊर्जाप्रतिक सोसायटीजवळ गटार बांधणे, रस्त्यांचे डांबरीकरण अशी अनेक विकासकामे त्यांनी केली आहेत.
४) विशेष कार्य.. स्वखर्चाने परिवहन स्टॉप बसविले, वॉर्डातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी एक पाण्याची लाईन घेतली, भाजी मार्केट, शाळेची दुरूस्ती, खारीगांवसाठी पर्यायी मार्ग, सार्वजनिक ठिकाणी बसण्यासाठी ३५ बाक तयार केले ही त्यांची विशेष कामे आहेत.
Leave a Reply