जन्म – १८४८ ; मृत्यू – १८९८
अण्णा मार्तंड जोशी हे एक महाराष्ट्रीय नाटककार होते. ते अण्णासाहेब किर्लोस्करांचें समकालीन होते. अण्णासाहेबांच्या देखरेखीखालीं बेळगावमध्ये स्थापन झालेल्या “भरतशास्त्रोत्तेजक” मंडळींत जोशी होते.
सन १८७९ मध्यें नोकरीकरितां ते मुंबईस गेले. तेथें ते हौशी मंडळी जमवून नाटकें करीत. संगीत सौभाग्यरमा सं. सावित्री व सं. शिवछत्रपतिविजय अशीं यांचीं स्वतंत्र तीन नाटकें उपलब्ध आहेत. त्यांचे प्रयोग “आर्यनाटयकलोत्तेजक” मंडळी मुंबईस करीत असे.
सौभाग्यरमेंत स्त्रियांच्या दुःस्थितीचें चित्र रेखाटलें आहे. अण्णा सुधारकमताचे असल्यानें तें चित्र त्यांनां भडक रंगात वठवितां आलें.
संगीत नाटकाच्या पहिल्या अमदानीचे जनक म्हणून डोंगरे, किर्लोस्करांबरोबर अण्णांचेही नाव घेणे जरूरीचे आहे.
Leave a Reply