केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ लेखिका अपर्णा मोहिले यांचा जन्म ६ ऑगस्ट रोजी झाला.
अपर्णा मोहिले हे सुपरिचित नाव आहे. मॅट्रिकला बोर्डामध्ये मुलींमधून पहिल्या आलेल्या ह्या हुशार विद्यार्थीनीने पुढे बी.ए., एम.ए. परीक्षांमध्येही चांगले यश मिळवले. अपर्णा मोहिले या १९६५ बॅचच्या भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकारी बनल्या.त्यांची पहिली निवड इंडीयन पोस्टल सर्व्हीस मध्ये झाली. अशा प्रकारची निवड होणाऱ्या त्या पहिल्या मराठी महिला अधिकारी होत्या.
भारत स्वतंत्र झाल्यावर मात्र माहिती आणि प्रसारण मंत्र्याच्या अधिकारात १९५१ साली चित्रपट परीक्षण बोर्डाचे काम चालू झाले.कायम चर्चेत आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेले बोर्ड अशी याची ख्याती आहे. या बोर्डावर अनेक मान्यवर येवून गेले. बऱ्या वाईट प्रमाणात सर्वांच्या कारकिर्दीत काही कटू गोड घटना घडल्या. अलीकडे कलावंताची या बोर्डाच्या अध्यक्ष पदावर नेमणूक कली जाते पण पूर्वी आय ए एस श्रेणीचा अधिकारी तिथे असायचा.
अपर्णा मोहिले १९८२-१९८३ या काळात त्या फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या कार्यकारी अध्यक्षा होत्या. तसेच १९९७-९८ या काळात त्या महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या चीफ पोस्ट मास्तर जनरल होत्या. ३१ ऑगस्ट २००२ ला त्या ३७ वर्षांच्या प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्या.
साहित्य, संगीत याची आवड असलेल्या अपर्णा मोहिले यांनी ‘संसार आणि सेन्सॉर (ललित)’ , ‘त्रिदल (नाटिकासंग्रह)’ , ‘शब्दपुष्पांजली (कवितासंग्रह)’ आणि ‘सेन्सॉर जीवनसार आणि मी (आत्मचरित्रपर)’ ही पुस्तके लिहिली आहेत.
Leave a Reply