अरुण कशाळकर हे एक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गाणारे मराठी गायक आहेत. त्यांचा जन्म ५ जानेवारी १९४३ रोजी झाला.
अरुण कशाळकर हे गायक पं. उल्हास कशाळकरांचे सख्खे बंधू.
अरुण कशाकरांचा ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर गायकीचा, तसेच जुन्या गायक मंडळींबाबतचा अतिशय डोळस अभ्यास आहे. कशाळकरांची गायकी ही तिन्ही घराण्यांच्या गायकाचा मिलाफ आहे. आग्रा घराण्याच्या गायकीवर त्यांचा विशेष भर असतो. त्यांच्या मैफिलीत ‘नोमतोम, ‘बोल’. ‘ताना’ या आग्रा घराण्याच्या वैशिष्ट्यांचा अनुभव येतो.
‘विलायत हुसेनखांच्या बंदिशींचे सौंदर्य’ या विषयावर कशाळकरांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाकडून संगीताचार्य ही डॉक्टरेट समकक्ष पदवी मिळवली आहे.
Leave a Reply