आपल्या काव्यशैलीने, साहित्यामध्ये स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे अरूण म्हात्रे यांनी कविता, कथा, ललितलेखन, संपादन, प्रकाशन अशा क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले.
आतापर्यंत त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यात बहिणाबाई पुरस्कार, शासनाचा “बालकवी पुरस्कार”, “वासंतीबाई गाडगीळ पुरस्कार”, भा.रा. तांबे पुरस्कार, पु.शि. रेगे काव्यस्पर्धेत सतत २ वर्षे पहिले पारितोषिक ह्यांचा समावेश आहे.
आतापर्यंत अरुण म्हात्रे यांनी एकूण कवितेची ४ पुस्तके लिहिली आहेत. त्या सर्वांना आतापर्यंत विविध पुरस्कार मिळाले. जवळजवळ २० वर्षे “अक्षर चळवळ” ह्या नियतकालिकेचे संपादन केले. मध्यंतरी त्यांच्या काव्यवाचनाचा “कवितांच्या गावा जावे” हा कार्यक्रम सादर होत असे. त्याचे १००० हून अधिक प्रयोग झाले.
कविश्रेष्ठ सुरेश भट, मंगेश पाडगांवकर, शंकर वैद्य यांचा सहवास व प्रेम मिळालेले अरुण म्हात्रे यांनी त्यांच्या वारसा यशस्वीपणे पुढे चालवला. ठाण्यातील ८१ व्या साहित्य संमेलनात सक्रीय सहभाग अरुण म्हात्रेंचा होता. त्यांनी १ दिवसीय कवितेची कार्यशाळा घेतली. प्रकाशन कट्ट्यावर काम केले. कवीसंमेलनात त्यांनी सहभाग घेतला. ठाण्यातील अनेक कवींच्या कवीतांचे प्रकाशन केले. सध्या ते ठाणे ग्रंथसंग्रहालयात सक्रीय आहेत.
संस्कार भारतीच्या माध्यमातून श्री पावसकर सर आणि कामत सर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे परिसरातील हौशी व व्यावसायिक चित्रकारांसाठी चित्रकला निसर्गचित्रण वर्ग चालविले.
कालच्या सुंदर ठाण्याकडे पाहताना, त्याच्या अत्याधुनिकतेकडे पाहताना उद्याचे ठाणे हे देखणे करण्याचा त्यांचा मानस आहे. कारण कवी हा गर्दीत मिसळूनही इतरांपेक्षा वेगळा असतो. तो शोध घेत असतो मानवी मनातील, त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील जाणीवांचा आणि ह्या जाणीवा जपायच्या असतील तर साहित्याचा वारसा लाभलेल्या ठाणे शहरात साहित्यविषयक उपक्रमांची वाढ व्हावी असे त्यांना वाटते.
Leave a Reply