सरस्वते, अरुण

“इच्छा असली की मार्ग सुचतात” आणि चांगल्या कामासाठी समाज ही प्रतिसाद देतोच. नेमका हाच अनुभव आला पुण्याच्या अरुण गणेश सरस्वते यांना. पुण्याच्या दापोडी परिसरात राहणार्‍या सरस्वते यांनी बजाज कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना, त्यांनी सौरऊर्जेचा वापर करुन दिवे लावण्याचा प्रकल्प तयार केला, “सोलर इलेक्ट्रिफिकेशन प्रोजेक्ट” या नावाने. आयुष्यात ज्यांना “दिवा” हा प्रकारच माहित नाही त्यांच्यासाठी ही गरज अधिक असणार म्हणूनच सरस्वते यांनी आसाममधील दुर्गम भागात असलेल्या हनग्रुम या हाफलॉंग तालुक्याची निवड केली आहे. त्या गावातील जवळपास ७० कुटुंबियांना सौर ऊर्जेवर चालणारे दिवे दिले, त्याआधी या गावातील रहिवाश्यांनी केवळ रॉकेल वर चालणारे दिवे पाहिले होते.

सौर दिव्यांसाठी आलेला सुमारे पावणेचार लाख रुपयांचा खर्च ८८ पुणेकरांनी दिलेल्या देणगीतून करण्यात आला आहे. २००३ मध्ये निवृत्ती स्विकारल्यानंतर ऊरुण सरस्वते सतत आसाम येथे वनवासी कल्याणाश्रमातर्फे चालविण्यात येणार्‍या वसतिगृहांमधील आदिवासी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी येत.पण शिकवताना वीज खंडीत होण्याचे प्रकार घडत, अर्थात त्यासाठी नैसर्गिक वातावरण कारणीभूत असे. त्यामुळे त्यांचं मन अस्वस्थ होत. एके दिवशी पुण्यातून सौरऊर्जेवर चालणारे २ दिवे त्यांनी खरेदी केले, व दहावीची परीक्षा देत असलेल्या २ आदिवासी मुलींना हे सौर दिवे भेट दिले.

या सौर दिव्यांमुळे, गावातील लोकांना अप्रुप वाटले व असे दिवे आपल्याला मिळाल्यास अनेक अडचणींवर मात करता येऊ अकेल, अशी मनीषा गावकर्‍यांनी व्यक्त केली. गावकर्‍यांच्या मदतीसाठी पुण्यातून त्यांनी निधी गोळा करण्याचं ठरवलं. जमेल तेवढी मदत सर्वांनी केली आणि सरस्वते यांनी ३.७७ लाख रुपये उभे केले. निवृत्त असल्याने इतक्या प्रचंड प्रमाणात निधी एकट्याला उभं करण शक्यच नव्हतं पण जेव्हा या योजनेची माहिती विस्तृतरित्या सांगण्यात त्यावेळेस शक्य तेवढी आर्थिक आपापल्यापरीने केली, असं सरस्वते आवर्जुन सांगतात.

पंचवीस वर्षांची हमी असलेले हे सौर दिवे आसामच्या नागरिकांसाठी “बहुमूल्य देणगी” ठरले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*