प्रामाणिक, न्यायप्रिय आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून अरविंद इनामदार यांची ख्याती होती. त्यांनी नेहमीच पोलीस दलातील अयोग्य आणि चुकीच्या गोष्टींवर सतत हल्ला चढवला होता. यामुळे ते नेहमीच चर्चेत असत. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९४० रोजी सांगली जिल्ह्यातील तडसर गावी झाला.
अरविंद इनामदार १ ऑक्टोबर १९९७ ते ५ जानेवारी २००० या दरम्यान राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून कार्यरत होते. पोलिस खात्यातील सर्वोच्च पदावर काम करताना वेळप्रसंगी सरकारच्या निर्णयाला विरोध करत, एक वर्ष आधीच त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.
अरविंद इनामदार यांनी गाजलेल्या जळगाव सेक्स स्कँडल हे प्रकरण यशस्वीपणे हाताळले होते.
अरविंद इनामदार यांचे निधन ८ नोव्हेंबर २०१९ रोजी झाले.
Leave a Reply