अरविंद रघुनाथ मयेकर

ज्येष्ठ सतारवादक

विविध वाद्यांचा उपयोग कोणत्या क्षणी, कसा करावा, त्यांच्या मर्यादा काय, याची पूर्ण जाण असलेले आणि शिवाय वेगवेगळे प्रयोग करून बघण्याची कल्पकता बाळगणारे आणखीन एक पडद्यामागील कलाकार….. अरविंद मयेकर. त्यांचा जन्म १८ जानेवारी १९३७ रोजी झाला. श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीमधारा उलगडला झाडातून अवचित हिरवा मोरपिसारा। या गाण्याच्या सुरुवातीची सतार ही मयेकरांनी वाजवलेली आहे.

त्रिदेव चित्रपटातील ओये ओये, तिरछी टोपीवाले या गाण्यातील इलेक्ट्रिक गिटार असो वा १९४२ अ लवस्टोरी चित्रपटातील एक लड़की को देखा तो ऐसा लगा मधील एकतारा, शालिमारचे रबाब या अफ़ग़ानी वाद्यामध्ये इंग्लिश बॅकग्राउंड असो वा ओ हंसीनि या गाण्यात संतूरच्या पद्धतीने वाजविलेले हार्प हे वाद्य असो, अरविंदजींनी केलेली कमाल अतुलनीयच आहे.

अरविंद मयेकर यांनी नटसम्राट, लेकुरे उदंड झाली, मत्स्यगंधा, कट्यार काळजात घुसली, गुंतता हृदय हे अशा सुप्रसिद्ध नाटकांचे बॅकग्राउंड संगीत दिले होते.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*