जोशी, अरविंद श्रीधर

Joshi, Arvind Shridhar

सनदी लेखापालाच्या व्यवसायामध्ये बॅंका, कंपन्या, इ.चे लेखापरिक्षण, मॅनेजमेंट कन्सल्टन्सी इ.मध्ये प्रावीण्य असणारे श्री अरविंद जोशी हे समाजकार्यातही अग्रेसर आहेत.

– १९८७ साली सी.ए. परीक्षा उत्तीर्ण.

– १९८८ -८९ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्ण वेळ प्रचारक. सोलापूर येथे त्यानिमित्त निरनिराळ्या ठिकाणी भेटी व कामात सहभाग

– १९८९ साली व्यवसाय सुरवात
– १९९० सालापासून “जोशी आणि करंदीकर” या नावाने भागीदारीत व्यवसायास सुरुवात
– व्यवसाय सुरु करणारी कुटुंबातील प्रथम व्यक्ती. आई वडिलांची व्यवसाय करण्यास उत्तम साथ.
– “एक अग्रगण्य फर्म” असा मागील २० वर्षांत नावलौकिक. यशस्वी व्यवसाय.
– व्यवसायात पत्नी सौ. संगीता जोशी हीचा संपूर्ण सहभाग व साथ.
– व्यवसाय करताना सामाजिक बांधीलकीची जाणीव. निरनिराळ्या सामाजिक कामात सक्रिय सहभाग.
– राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सक्रीय कार्यकर्ता.
– व्यवसायामध्ये अनेक नविन व्यक्तींना सहाय्य.
– व्यवसायामध्ये बॅंका, कंपन्या, इ.चे लेखापरिक्षण, मॅनेजमेंट कन्सल्टन्सी इ.मध्ये प्रावीण्य.
– १९९३ ते २००८ पर्यंत के.जे. सोमैय्या – सायन्स व कॉमर्स कॉलेज येथे व्याख्याता म्हणून काम. यशस्वी व विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून मान्यता.
– “श्री. कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचा” विश्वस्त म्हणून १० वर्षे जबाबदारी ठाण्यामध्ये नववर्ष स्वागत यात्रा प्रारंभ करण्यात सक्रीय सहभाग. २००९ च्या स्वागत यात्रेची निमंत्रक अशी जबाबदारी.
– “इग्नायटेड माइंडस्” या मंडळाचा एक सदस्य. सध्या “जल है तो कल है” या प्रकारे घोषवाक्य असलेल्या “पाणी वाचवा” जागरण मोहिमेचा कार्यकर्ता म्हणून काम.

(संदर्भ : स्वतः पाठविलेल्या माहितीवरुन)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*