राजकारणाचा वारसा वडिलांकडून लाभलेले पण स्वकर्तृत्वाच्या आधारे यशाचे शिखर गाठणारे सक्षम नेतृत्व.
अशोक चव्हाण यांच्या व्यक्तिमत्त्वात उपजतच एक कुशल प्रशासक दडलेला आहे.
केंद्र शासनाच्या कर्जमाफीचा लाभ न झालेल्या ४० लाख शेतकर्यांना ६२०८ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय त्यांनी घेतला. मागास भागाच्या विकासासाठी विशेष पॅकेज जाहीर केले. विदर्भ, मराठवाडा पाणलोट विकास मिशनची स्थापना केली. आम आदमीला दिलासा देण्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा प्रारंभ करुन मजुरीच्या दरात वाढ केली. मोठ्या प्रमाणात नोकरभरती मोहीम राबविण्यात आली. अल्पसंख्याकांच्या विकासाकडे विशेष लक्ष देण्यात आले. तीर्थक्षेत्रांचा नियोजनबद्ध आणि गतिमान विकास करण्यासाठी प्राधिकरण स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला.
शासकीय कर्मचार्यांना ६ वा वेतन आयोग लागू करण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल त्यांनी उचलले. औद्योगिक आघाडी आणि गुंतवणुकीत राज्याला प्रथम क्रमांक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. राज्याच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन एनएसजीच्या धर्तीवर फोर्स वनची स्थापना केली. पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रे मिळवून दिली. एकूणच अशोक चव्हाण यांच्या कुशल व कणखर नेतृत्वाखाली राज्याची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे.
Leave a Reply