१९८२ सालचा राष्ट्रपतींच्या हस्ते “आदर्श शिक्षक पुरस्कार”, ठाणे जिल्हा परिषदेचा “आदर्श शिक्षक” पुरस्कार, ठा.म. पालिकेचा, “ठाणे भूषण”, “ठाणे नगर रत्न” आदी अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
कथा, कादंबरी, चरित्रे, काव्यसंग्रह, निबंधसंग्रह, समीक्षाग्रंथ, आत्मचरित्र आदी ग्रंथांचे संपादक म्हणून २० ग्रंथांचे लेखन करणारे; २००० व्याख्याने, ५७० कथाकथनाचे कार्यक्रम; को.म.सा.प. ठाणे शाखेचे १३ वर्षं अध्यक्ष, संस्थापक आणि कलायन या नाट्यसंस्थेचे १४ वर्षं कार्यवाह म्हणून कार्यरत असणारे शिक्षण क्षेत्रातही भरीव कामगिरी करणारे ठाण्यातले अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे श्री. अशोक चिटणीस होय.
ठाण्यातील डॉ. बेडेकर विद्यामंदीराचे ३० वर्षं प्राचार्य म्हणून कार्यभार वाहिलेल्या अशोक चिटणीस यांनी शिक्षण विषयक, साहित्यविषयक, सांस्कृतिक अशा अनेक कार्यक्रमांचे संयोजन केले आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे ४ वर्षं, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे ३ वर्षं आणि अशा अनेक राज्यस्तरीय समित्यांचे ते सदस्य राहिलेले आहेत.
मनातील ठाणे : चिटणीस सर ठाण्याविषयी म्हणतात की, गेली ६७ वर्षं ठाणे शहर काहीसं जवळून व दुरून पाहिलं आहे. नौपाड्यातील ग्राम पंचायतीचे कार्य पाहिले, ठाणे लहानाचे मोठे होताना पाहिले. कालच्या ठाण्यात रिक्षा, स्कूटर यांची निर्मिती झालेली नव्हती. रस्ते, माती, दगडांचे होते. वाडे, विहिरी होत्या. आज वाडे, चाळी नष्ट होऊन तिथे फ्लॅटस, प्लॉटस, मॉल्स, टॉवर्स आहेत. नवी थिएटर्स झाली आहेत. वृक्षतोड होत असून झोपडपट्ट्या वाढत आहेत. फेरिवाल्यांची आक्रमणे वाढत आहेत. फ्लायओव्हर्स, रस्ते रूंदीकरण, तलाव सुशोभिकरण, आर्ट गॅलरी, रुग्णालये, ज्येष्ठ नागरिकांसाठी इमारती वगैरे जमेच्या बाजू आहेत. असं चिटणीस सरांचं मत आहे.
Leave a Reply