सहा दशकांहून अधिक काळ अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आत्माराम भेंडे यांनी इंडियन नॅशनल थिएटरमधून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. त्यांचा जन्म ७ मे १९२३ रोजी झाला.आपल्या सहजसुंदर अभिनयानं मराठी रंगभूमी, सिनेसृष्टी, बॉलिवूड, जाहिराती, हिंग्लिश नाटकं आणि मालिकांमधून रसिकांना निखळ आनंद देणारे, त्यांच्या मनात प्रेमाचं-आदराचं स्थान मिळवणारे आत्माराम भेंडे यांनी, ‘एक सुसंस्कृत विनोदी अभिनेते’ म्हणून स्वतःचा ठसा उमटवला होता.
रसिकांना हसवण्यासाठी अंगविक्षेप किंवा कुठलाही थिल्लरपणा करायची गरज नसते, तर चेहऱ्यावरचे हावभाव, शब्दफेक आणि टायमिंगमधून उत्तम विनोदनिर्मिती करता येते, हे त्यांनी दाखवून दिलं होतं. रंगभूमी, सिनेमा, जाहिराती, मालिकांमध्ये ते अगदी लिलया वावरले होते. फक्त अभिनेते म्हणूनच नव्हे, तर दिग्दर्शक आणि निर्मात्याची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे पेलली होती.
ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
http://www.marathisrushti.com/articles/atmaram-bhende/
# Bhende, Atmaram
Leave a Reply