झी मराठी वाहिनीवरील जय मल्हार या पौराणिक मालिकेत खंडोबाच्या दरबारातील “हेगडी प्रधान” या महत्त्वपूर्ण व्यक्तीरेखेची भुमिका साकारणाची संधी अतुल अभ्यंकर यांना मिळाली होती. त्यांच्या दमदार अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांची भरभरुन दाद मिळाली होती. झी मराठी अॅवॉर्डस २०१४ मध्ये अतुल अभ्यंकर यांना “सर्वोत्कृष्ट पुरुष व्यक्तिरेखेच्या पुरस्कारा”ने सन्मानित देखील करण्यात आले होते.
लहानपणापासूनच दादरमध्ये वाढलेल्या अतुल अभ्यंकर यांचं शालेय शिक्षण बालमोहनमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण कीर्ती मध्ये झालं होतं. अभियनाबरोबरच ते गायनात ही पारंगत होते. “सारंगा तेरी याद में”, “मी नथुराम गोसडे बोलतोय”,“काय बाई सांगू”, “केशवा माधवा”, “सारे प्रवासी घडीचे”, “आई रिटायर होतेय” यांसारख्या नाटकांमधून अतुल अभ्यंकर यांनी त्यांच्या अभिनयाची रसिकांवर छाप पाडली होती.
जय मल्हार ही मालिका ऐन झोकात असतानाच त्यांचे १२ नोव्हेंबर २०१४ या दिवशी सकाळी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी ते ४२ वर्षांचे होते. विशेष म्हणजे निधनाच्या ३ महिन्यांपूर्वी अभ्यंकर विवाहबध्द झाले होते. त्यांच्या पश्चात आई व पत्नी असा परिवार आहे.
(लेखन व संशोधन – सागर मालाडकर)
Leave a Reply