जन्म तारीख : 7 जून 1968
1986 पासून लातूर येथे लोकमतमधून पत्रकारितेची सुरुवात. नंतर औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी काम केले. सध्या मुंबईत ब्युरो चिफ या पदावर कार्यरत. पत्रकारिता करताना सामाजिक विषय आणि व्यवस्थेवर प्रहार करणारे सातत्याने केलेले लेखन हे जमेची मोठी बाजू. विविध वृत्तमालिका लिहीत असताना सामान्य माणूस केंद्रबिदू ठेवून केलेल्या लिखाणामुळे अनेक थांबलेले विषय मार्गी लागले.
आई वनमाला आणि वडील खंडेराव हे दोघेही प्राथमिक शाळेत शिक्षक. तर पत्नी दीपा या डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या संपादकत्वाखाली निघणार्या स्पंदन या त्रैमासिकात काम करतात. मुलगी गार्गी ही पुण्यात सिम्बॉयसिस इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे.
विविध पुरस्कार :
1) महाराष्ट्र शासनाचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय पुरस्कार.
2) महाराष्ट्र शासनाचा आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार.
3) लोकमत तर्फे दिला जाणारा पा.वां. गाडगीळ लोकमत शोध पत्रकारिता. (दोन वेळा)
4) लोकमत तर्फे दिला जाणारा उत्कृष्ट वार्ता पुरस्कार. (तीन वेळा)
5) बालकुमार साहित्य संमेलनाचा बाल साहित्याच्या समिक्षेसाठीचा सिताबाई भागवत पुरस्कार.(दोन वेळा)
6) महिलांना समाजात चांगले स्थान मिळाले पाहिजे हा विषय घेऊन लिहीलेल्या ‘जाता जाता’ या सदरास लाडली मिडीया जेंडर सेन्सेटीव्हीटी पुरस्कार.
7) 26:11 ऑपरेशन मुंबई या पुस्तकाला महाराष्ट्र संपादक परिषदेचा पुरस्कार.
ठळक नोंदी :
१) तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्या उपस्थितीत पाकिस्तानात झालेल्या सार्क कॉन्फरन्ससाठी निवड. पाकिस्तान दौर्यातील लिखाण बातमीच्या पलिकडे जाऊन माणूस शोधणारे.
२) डॉ. शरदचंद्र चटोपाध्याय यांच्या ‘बडी दिदी’ या हिंदी पुस्तकाचा मराठीतही ‘लुका’ यानावाने अनुवाद.
३) जय महाराष्ट्र या दूरदर्शनवरील कार्यक्रमात अनेक मान्यवरांच्या थेट मुलाखती.
४) औरंगाबादेत परिवर्तन या संस्थेचे सचिव म्हणून अनेक वर्ष कार्यरत. या संस्थेने नलिनी पंडीत यांच्या अध्यक्षतेखालील विचारवेध संमेलनही भरवले होते.
५) मकाऊ येथे झालेल्या आयफा अवॉर्ड कार्यक्रमाचे वृत्तांकन. मकाऊचे वेगळेपण टिपत केलेले लेखन त्यावेळी चांगलेच गाजले होते.
६) २६/११ च्या घटनेनंतर अवघ्या तीन महिन्यात या विषयावर निघालेले पहिले पुस्तक.
७) एफडीए विभागावर लिहीलेल्या मालिकेनंतर सरकारने चौकशी समिती नेमली व त्यासाठी जो जीआर काढला त्यात लोकमतचा उल्लेख केला गेला शिवाय छापून आलेल्या सगळ्या बातम्यांच्या अनुषंगाने सखोल चौकशी करावी असाही त्यात उल्लेख होता. अशा पध्दतीने एखाद्या वर्तमानपत्रचा उल्लेख करीत निघालेला हा पहिला जीआर आहे
संकेतस्थळ : www.atulkulkarni.in
Leave a Reply