आविष्कार दारव्हेकर! मराठी मालिका , नाटक आणि चित्रपट क्षेत्रात नावाजलेलं नाव.
त्याचा जन्म १२ ऑगस्ट १९७६ रोजी नागपुरात झाला. त्याचे शालेय जीवन नागपुरातच पूर्ण झाले. नागपुरातील सोमलवार हायस्कूल मध्ये त्याने शालेय शिक्षण घेतले.
त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात २००४ साली झाली. पुढे त्याने अनेक मराठी चित्रपट केले. त्यातील किरण कुलकर्णी vs किरण कुलकर्णी (२०१६) , ती आणि इतर (२०१७) , देवा शपथ खोटं सांगेन (२००६) , आई तुझा आशीर्वाद (२००४) , जुईली (२००४) , सुहासिनीची सत्त्वपरीक्षा (२००४) ही नावं प्रेक्षक कधीच विसरू शकत नाहीत. मृत्युपत्र (२००५) मधील राजेश नामक पात्र आविष्कारने खूप छान रंगवलं.
मालिकेत आतापर्यंत त्याने दुर्वा आणि बऱ्याच वैविध्यपूर्ण मालिका केल्या आहेत.
आविष्कार दारव्हेकर हा सुप्रसिद्ध लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर ह्यांचा नातू आहे.
## Avishkar Darvhekar
Leave a Reply