
बबन प्रभू यांचे मूळ नाव साजबा विनायक प्रभू. त्यांचा जन्म १६ डिसेंबर १९२९ रोजी झाला.
बबन प्रभू हे मराठी रंगभूमीवरील एक अभिनेता आणि नाटककार होते.
“झोपी गेलेला जागा झाला”, “दिनूच्या सासूबाई राधाबाई” ही त्यांची गाजलेली नाटके. ‘झोपी गेलेला जागा झाला’ हे त्यांनी लिहिलेले नाटक खूप लोकप्रिय झाले होते. मुंबई दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात बबन प्रभू रोज एकदातरी पडद्यावर येऊन काही गमतीदार गोष्टी, चुटके किंवा विनोद सांगत असत.
सुप्रसिद्ध आकाशवाणी निवेदक आणि कलाकार नीलम प्रभू ह्या त्यांच्या पत्नी होत.
१९८१ मध्ये बबन प्रभू यांचे निधन झाले.
- बबन प्रभूंनी लिहिलेली नाटके
- चोरावर मोर
- झोपी गेलेला जागा झाला
- दिनूच्या सासूबाई राधाबाई
- पळा पळा कोण पुढे पळे तो
- माकड आणि पाचर
- घोळात घोळ
बबन प्रभू यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.
मराठी रंगभूमीवरील फार्सचा राजा बबन प्रभू (9-Apr-2019)
ज्येष्ठ अभिनेते आणि नाटककार बबन प्रभू (16-Dec-2021)
## Baban Prabhu
Leave a Reply