विद्यार्थी दशेपासूनच स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असलेले बॅरिस्टर बाबासाहेब भोसले हे प्रखर बुद्धिमत्ता आणि तल्लख विनोदबुद्धी असलेले बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द अल्प असली तरी ती त्यांच्यातील उपजत गुणवत्ता सिद्ध करणारी होती. त्यांच्या कारकिर्दीत असंघटीत व असंरक्षित क्षेत्रातील लाखो श्रमिकांकरिता “श्रमजीवी कुटुंबाश्रय योजना” सुरु केली. दहावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. स्वातंत्र्यलढ्यातील सैनिकांच्या निवृत्तीवेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. अमरावती विद्यापिठाची स्थापना, कोल्हापूर येथे मराठी चित्रपटसृष्टीचा निर्णय, गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती, औरंगाबाद येथे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची सुरुवात आदी निर्णय त्यांच्याच काळात घेतले गेले. पोलीस दलातील विविध सुधारणांचे श्रेयही बाबासाहेबांनाच द्यावे लागते.
Leave a Reply