बाबुलाल केदु अहिरे यांचा जन्म पाटणे या खेडेगावात 8 ऑक्टोबर 1939 रोजी झाला. सध्या पाटणे येथील महात्मा फुले शिक्षण संस्था या सरकारी शैक्षणीक संस्थेचे प्रमुखपद ते भुषवित आहेत.
याआधी त्यांनी महात्मा फुले जेष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष म्हणून आपल्या सेवाभावी वृत्तीचा व व्यवस्थापकीय कौशल्यांचा, ठसा उमटवुन तेथील चालु कार्यपध्दतीत अनेक क्रांतीकारी व अमुलाग्र बदल केले होते. त्याचप्रमाणे त्यांनी हिंदु देवालय पंच, पाटणे या देवस्थानाचे व्यवस्थापकीय ट्रस्टी म्हणून देखील काही वर्षे कार्यभार सांभाळला आहे.
हाडाने शेतकरी असलेल्या अहिरेंनी पाटणे येथील शाळेच्या मुख्यध्यापकपदापर्यंत मजल मारली होती. या गावातील कित्येक मुलांना शाळेची गोडी निर्माण करण्यात व त्यांच्या मनामध्ये विज्ञानवादी दृष्टीकोनाचा प्रसार करण्यात बाबुल यांचा सिंहाचा वाटा असल्याने त्यांना गावामध्ये फार आदराचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झालेले आहे.
aata te jyesth nagarik mitra mandal pataneche president aahet . he mitra mandal vristh KATTA mhanun hi olakhale jate.