बाबुराव सडवेलकर यांचे शालेय शिक्षण कोल्हापूर येथील राजाराम हायस्कूलमध्ये व महाविदयालयीन शिक्षण राजाराम कॉलेजमध्ये झाले. चित्रकार, कलासमीक्षक आणि या विषयावरील एक सिद्धहस्त लेखक बाबुराव सडवेलकर यांचा जन्म २८ जून १९२८ रोजी वेंगुर्ले येथे झाला.
शालेय जीवनातच चित्रकार होण्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्या ठायी निर्माण झाली व ह्या प्रेरणेने त्यांनी ‘ सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट ’, मुंबई येथे उच्च कलाशिक्षणासाठी प्रवेश घेतला.
अध्यापन करीत असताना ‘ फुलब्राइट स्मिथमुंट ’ उपक्रमांतर्गत शिष्यवृत्ती मिळवून ते अमेरिकेला गेले व आधुनिक कलाशिक्षण-पद्धतींचा व तंत्रांचा तेथे त्यांनी अभ्यास केला.
“वर्तमान चित्रसूत्र” आणि “महाराष्ट्रातील कलावंत” हे त्यांचे लेखसंग्रह झाले आहेत.
बाबुराव नारायण सडवेलकर यांचे २३ नोव्हेंबर २००० रोजी निधन झाले.
Leave a Reply