महाराष्ट्राचे लाडके नाटककार बाळकृष्ण हरी तथा बाळ कोल्हटकर हे उत्कृष्ट कवी, अभिनेते आणि दिग्दर्शक होते.
उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे बाळ कोल्हटकर म्हणजे नाटयसृष्टीतला एक मानबिंदू.
बाळ कोल्हटकरांचा जन्म २५ सप्टेंबर, १९२६ रोजी सातारा येथे झाला. त्यांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंतच झाले. त्यांना लहानपणापासूनच नाटकांची अतिशय आवड होती. त्याचबरोबर लेखनाचीही आवड होती. त्यामुळे लहानपणीच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी “जोहार” हे आपले पहिले नाटक लिहिले. त्यांची बरीच नाटकं अतिशय लोकप्रिय झाली. त्यांनी लिहिलेली नाटकं ही भावनाप्रधान आणि कौटुंबिक अशी असत.
‘वाहतो ही दुर्वांची जुडी’, ‘वेगळं व्हायचंय मला’, अशी काही प्रसिद्ध नाटकं लिहिली तसेच सीमेवरुन परत जा, लहानपणा देगा देवा, देव दीनाघरी घावला, देणार्याचे हात हजार, उघडलं स्वर्गाचे दार, इत्यादी त्यांची गाजलेली नाटके.
बर्याच नाटकांचे हजाराच्या वर प्रयोग झाले. त्यांनी व्यावसायिक रंगभूमीसाठी नाटकं लिहिली तरीही प्रत्येक नाटकातून काही मूल्य जपली होती. “दुरितांचे तिमिर जावो” या नाटकांचे पंधराशे प्रयोग, ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ या नाटकाचे चौदाशे प्रयोग, मुंबईची माणसे’ याचे जवळपास दोन हजाराच्या वर तर ‘एखाद्यांचे नशीब’ या नाटकांचे हजारावर प्रयोग झाले.
त्यांनी एकंदर ३० हून अधिक नाटके लिहिली. ३० जून १९९४ रोजी त्यांचे निधन झाले.
बाळ कोल्हटकर यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.
नाटककार, अभिनेते बाळ कोल्हटकर (21-Jul-2017)
मराठीतील नाटककार, कवी, अभिनेते, दिग्दर्शक बाळ कोल्हटकर (3-Oct-2017)
मला बाळ कोल्हटकर यांनी लिहिलेले उघडले स्वर्गाचे दार ह्या नाटकाचे पुस्तक हवे आहे असेल तर कींमत मी लगेच पाठवन