(१२ डिसेंबर १७२१-२३ जुन १७६१)
भट घराण्यातील तिसरा पेशवा (कारकीर्द – १७४०-६१). नानासाहेब व बाळाजी बाजीराव या दोन्ही नावांनी प्रसिद्ध असलेला पहिला बाजीराव व काशीबाई यांचा ज्येष्ठ मुलगा.
जन्म मौजे साते (नाणे मावळ-पणे जिल्हा) येथे झाला. बाळाजीने चिमाजी आप्पा आणि अंबाजी पुरंदरे याच्या हाताखाली लहानपणी सातार्यात सर्व प्रकारचे शिक्षण घेतले. शाहू महाराजांसोबत तो मिरजेच्या स्वारीत १७३९ मध्ये होता.
पहिल्या बाजीरावाच्या मृत्यूनंतर – छत्रपती शाहुनी त्यास २५ जून १७४० रोजी पेशवाईची वस्त्रे दिली. मराठी राज्याचा कारभार पहावयाचा व राज्याबाहेरील हिंदुस्थानभर मराठी सत्तेचे वर्चस्व प्रस्थापित करावयाचे हे पेशव्याचे उद्दिष्ट होते.
# Balaji Bajirao Peshwe
Leave a Reply