कॉंग्रेस पक्षातील ठाणे जिल्हा अध्यक्ष राहिलेल्या बाळकृष्ण पुर्णेकर यांचा लौकिक नेहमीच सामान्यांना सहज उपलब्ध होणारे, ठरविलेले काम पूर्ण करणे व सामाजिक संवादातून कल्पक विकासकार्य उभे करणे अशी ओळख पुर्णेकर यांनी मिळविली आहे. १९९७ पासून ठाणे जिल्ह्याचे युवाध्यक्ष पदापासून ते २०१४ पर्यंत ठाणे जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षाच्या बळकटी करणासाठीचे त्यांनी प्रचंड मेहनत केली आहे.
झेंडा मार्च असो वा काँग्रेस इतिहासाचा इव्हेंट, अशा महत्वाच्या प्रसंगाना त्यांचे संघटनगुण व व्यक्तित्वाच्या विविध छटा नेहमी अधोरेखित झाल्या आहेत. ठाणे शहराचे नागरीकरण अत्यंत वेगाने वाढीत असून त्या अनुषंगाने शहरी लोकांनामहत्वाच्या व मूलभूत ठरणार्या गोष्टी त्यांना मिळवून देण्यासाठी वेळोवेळी त्यांनी शासनाकडे व ठाणे पालिकेकडे केलेला पाठपुरावा अत्यंत फलदायी ठरला आहे.
मध्यंतरीच्या काळात बाळकृष्ण पुर्णेकरांनी नागरिकांना दैनंदिन जीवनात लागणार्या विविध दाखल्यांसंदर्भात मोठा व भव्य उपक्रम राबवून हजारो नागरिकांना दाखले मिळवून दिले होते. युवकांचा मोठा रोजगार मेळावा आयोजित करुन तब्बल ८५० बेरोजगारांच्या मुलाखती घेवून त्यांना खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत; यावरुन त्यांच्यातल्या सामाजिक बांधिलकी व तळमळीची पुरेपूर साक्ष देते.
Leave a Reply