प्राध्यापक बापुराव जगताप हे प्रख्यात नामांतरवादी नेते, लेखक, व निळ्या पहाडीवरच्या कवितांचे जनक असे अष्टपैलु व्यक्तिमत्व होते. आंबेडकरांचे कट्टर अनुयायी व गाढे आभ्यासक असलेले जगताप हे अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या तत्वप्रणालीशी एकनिष्ठ राहिले.
औरंगाबाद येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातून प्रा. बापुराव जगताप हे मराठी विभागप्रमुख म्हणून २००१ साली निवृत्त झाले होते. मराठवाडा विद्यापीठला बाबासाहेबांचे नाव मिळावे या मागणीसाठी स्थापन झालेल्या नामांतर कृती समितीचे ते कार्याध्यक्ष राहिले होते.
महाराष्ट्र शासनाने त्यांना दलित मित्र पुरस्कार देवून सन्मानित केले होते. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखालील मराठी विश्वकोषाचे सहसंपादक म्हणूनही काम करण्याची संधी प्रा. जगताप यांना मिळाली होती. विद्यापीठ नामांतर चळवळीवरच्या त्यांच्या ‘निळ्या पहाडावरच्या कविता’ विद्यापीठाने आभ्यासक्रमातही सामाविष्ट केल्या होत्या. लोकमत वृत्तपत्राच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले होते.
मराठीसंबंधीचा गाढ आभ्यास असलेला, सामाजिक प्रश्नांसंबंधी आग्रही भुमिका घेणारा, व प्रभावी काव्यलेखन करणारा हा प्रखर विचारांचा साधक व कार्यकर्त दि. ६ ऑगस्ट २०११ रोजी औरंगाबाद येथे काळाच्या पडद्याआड गेला. ”पापण्यांच्या किनार्यावर” हा त्यांचा कवितासंग्रहही खुप प्रसिध्द आहे.
Leave a Reply