विठ्ठलराव गाडगीळ स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री नरहर विष्णू उर्फ काकासाहेब गाडगीळ
यांचे चिरंजीव. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९२८ रोजी झाला. मराठी राजकारणी आणि काँग्रेसपक्षाचे सक्रीय कार्यकर्ते आणि राज्यसभा व लोकसभेचे खासदार आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील होते.
विठ्ठलराव गाडगीळ हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी होते. ते संसदीय काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी, १९७१ आणि १९७६ मध्ये राज्यसभा सदस्य होते. विठ्ठलराव गाडगीळ हे १९७५ ते १९७७ या काळात इंदीरा गांधी यांच्या मंत्रीमंडळात संरक्षण उत्पादन मंत्री राहिले होते, राजीव गांधींच्या कारकिर्दीत “माहीती आणि नभोवाणी” खात्याचे मंत्री होते.
ग.प्र. प्रधान यांच्या मतानुसार “लोकशाहीच्या राजमार्गावरील विवीध संघर्षांचे,घटनांचे घटनांमागील विचार प्रवाहांचे वर्णन विवेचन आणि विश्लेषण विट्ठलराव गाडगिळांच्या लेखनातून झाले असून , खासदार आणि मंत्र्यांच्या आधीकार कक्षा आणि मर्यादांचे पैलू गाडगीळांच्या लेखनात येतात परंतु इंदिरा गांधींची कार्यपद्धती आणि आणीबाणी विषयी लेखन करताना ग.प्र. प्रधानांच्या मतानुसार विट्ठालराव गाडगीळांची लेखणी अडखळत असे.
विठ्ठलराव गाडगीळ यांचे ६ फेब्रुवारी २००१ रोजी निधन झाले.
Leave a Reply