अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनचा जन्म २३ फेब्रुवारी १९६९ रोजी मुंबईमध्ये झाला.
भाग्यश्री पटवर्धन ही सांगलीच्या पटवर्धन राजघराण्याची असून भाग्यश्रीचे पूर्ण नाव श्रीमंत राजकुमारी भाग्यराजे पटवर्धन आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात छोड्या पडद्यावरुन केली होती.१९८७ मध्ये तिने अमोल पालेकर यांच्या ‘कच्ची धूप’ या टीव्ही शो मध्ये काम केले होते.
१९८९ मध्ये भाग्यश्रीने ‘मैने प्यार किया’ मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. मैने प्यार किया या चित्रपटामध्ये भाग्यश्री ने सलमान खानसोबत नायिकेची भूमिका केली होती. मैने प्यार किया प्रदर्शनावेळी भाग्यश्री केवळ १९ वर्षाची होती. मैने प्यार किया या चित्रपटामुळे ती रातोरात स्टार झाली.
भाग्यश्रीने अभिनेता अमोल पालेकर व्दारा निर्मित ‘कच्ची धूप’ या मालिकेतून करिअरला सुरूवात केली होती. ही मालिका दुरदर्शनवर प्रसारित होत होती. सलमान खानसोबतची जोडी लोकांनी डोक्यावर घेतली होती आणि सिनेमासुध्दा बराच गाजला होता.
भाग्यश्रीने नवरा हिमालयसोबत ‘त्यागी’ (१९९२), ‘पायल’ (१९९२) आणि ‘कैद में है बुलबुल’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. परंतु हे तिन्ही चित्रपट बॉक्सऑफिसवर फ्लॉपट ठरले.
१९९३ मध्ये ‘घर आया मेरा परदेशी’ मध्य भाग्यश्रीने काम केले. २००१ मध्ये भाग्यश्रीने पुन्हा एकदा ‘हेल्लो Girls’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये परतण्याचा प्रयत्न केला.
२०१५ मध्ये भाग्यश्री ‘लौट आओ त्रिशा’ या मालिकेत दिसले. ही मालिका खुप प्रसिध्द झाली. यासोबतच ती ‘झलक दिखला जा’ मध्ये स्पर्धक म्हणून दिसली.
अभिमन्यू दासानी ने २०१९ मध्ये आलेल्या मर्द को दर्द नही होता या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात अभिमन्यू शिवाय राधिका मदान, गुलशन देवय्या आणि महेश मांजरेकर यांनी काम केले आहे.
काही दिवसांपूर्वी भाग्यश्री कंगना राणौत अभिनित ‘थलायवी’ चित्रपटात दिसली होती. भाग्यश्रीची मुलगी अवंतिका दासानी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अवंतिका लवकरच रोहन सिप्पीच्या सायकोलॉजिकल थ्रिलर-ड्रामा वेब सीरिज ‘मिथ्या’ मध्ये दिसणार आहे.
Leave a Reply