भालचंद्र श्रोत्री हे अलिबाग-उरण परिसरातील सामाजिक कार्यकर्ते होते.
सेवानिवृत्त शासकीय अधिकारी असलेल्या श्रोत्री यांनी सार्वजनिक वाचनालय आणि सेवानिवृत्तांच्या संघटनेचे अध्यक्षस्थानही भूषविलेले होते. उरणच्या अनेक सामाजिक संस्थांवर त्यांनी काम केले.
त्यांच्या पुढाकारा मुळेच रायगड जिल्हातील कायस्थ समाजाचे मेळावे भरायला सुरवात झाली. उरण मध्ये प्रथम मेळावा भरला होता.
महाराष्ट्र टाइम्स चे पहिले ब्रँड मॅनेजर सुधाकर श्रोत्री यांचे ते थोरले बंधू व अभिनेता पुष्कर श्रोत्री यांचे काका होत.
Leave a Reply