भुपेश कुंभार यांनी भारताच्या तंत्रज्ञान विकासाला विशेषतः गाड्या बनविण्याच्या गुंतागुंतीच्या क्षेत्रातील क्रांतीप्रती त्यांनी दिलेले योगदान अद्वितीयच मानले पाहिजे. सल्ला-मसलत हा त्यांचा आवडीचा प्रांत असल्यामुळे ते सध्या बजाज ऑटो लिमीटेड या नावाजलेल्या कंपनी क्षेत्रातील सर्व सल्ला मसलतींचे काम व ग्राहकांना आपल्या परिवारात खेचुन घेण्याचे काम मोठ्या निष्ठेने करीत आहेत.
कुसरो वाडिया इनस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेमधून शिक्षण व अद्ययावत प्रशिक्षण घेणार्या भुपेश यांनी भारत इंग्लिश स्कुल येथे आपले शालेय शिक्षण पुर्ण केले होते. कार्यकारी व व्यवस्था विश्लेषण (फन्कशनल आणि सिस्टीम अॅनालिसीस ) या उपक्षेत्रांमधले त्यांचे प्राविण्य व कसब सर्वज्ञात आहे. प्रकल्पप्रमुख म्हणून महिन्द्रा व सत्यम या ऐतिहासीक कंपन्यांमध्ये आपल्या उत्तुंग प्रतिभेची व चौफेर कर्तुत्वाची मोहोर उमटविल्यामुळे, त्यांचा अॅटोमोबाईल क्षेत्रातील अनुभव फारच दांडगा आहे.
Leave a Reply