सामान्य जनतेच्या उत्कर्षासाठी अविरतपणे धडपडणारे कणखर नेतृत्व.
महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शाहू महाराज यांच्या विचारांना आदर्श मानून छगन भुजबळ यांनी आपली राजकीय वाटचाल सुरु ठेवली आहे. उपेक्षित, पददलित व मागासवर्गीयांना न्याय मिळवून देण्यात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. ही त्यांच्या कुशल व कल्पक नेतृत्वाचीच किमया आहे की. त्यांनी ३ वेळा महाराह्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद भूषविले आहेत. मुंबईचे महापौर, महसूल, गृहनिर्माण, गृह, सार्वजनिक बांधकाम आदी खात्यांचे मंत्री म्हणूनही त्यांची कारकीर्द लक्षणीय राहिली आहे.
Leave a Reply